मोहोळ – गेली 25 वर्षे ज्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात घरावर तुळशीपत्र ठेवून विरोध टिकवून ठेवला व गेल्यावेळी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खासदार व आमदार निवडून आणून तालुक्यात परिवर्तन घडविले, त्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक असून सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये संधी देऊन धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करून प्रसंगी लोकवर्गणी गोळा करून त्या उमेदवाराला ताकद देऊन मोहोळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवू.” असे प्रतिपादन राष्ट्रवादी कांग्रेसचे (शरदचंद्र पवार ) प्रमुख नेते लोकसेवक संजय क्षीरसागर यांती केले .
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक २०२६ संदर्भात मोहोळ तालुका महाविकास आघाडीची बैठक हॉटेल धुलवड हॉल मोहोळ येथे पार पडली.
…. या बैठकीमध्ये काँग्रेस आय पक्षाचे नेते सुरेश शिवपूजे,सिद्राम पवार,बिरुदेव खरात, ज्ञानेश्वर कदम, दमन चव्हाण तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळासाहेब वाघमोडे वक्ते, अशोक भोसले तालुकाप्रमुख, तुकाराम माने विधानसभाप्रमुख, सत्यवान देशमुख शहरप्रमुख, रमेश शिंदे, श्रीधर चव्हाण, कयूम शेख, नरसिंह पाटील, मनोज नागणे, प्रभाकर हावळे, शंकर भोसले, देविदास चेंडगे यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय क्षीरसागर, सतीश पाटील, दत्तात्रय पाटील, विलास पाटील, धनाजी गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे अनिल महानवर,बंडू देवकते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पप्पू पाटील, विकास जाधव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष धीरज कसबे, अँड. विठोबा पुजारी, शेतकरी कामगार पक्षाचे संतोष कारंडे, शिंदे सेनेचे दादासाहेब पवार, दादा करणावर, केशव वाघचवरे, संतोष जाधव, दत्ता कदम, तुकाराम भोसले, रिपब्लिकन पक्षाचे पांडुरंग जवंजाळ यांचे सह महिला काँग्रेस च्या अंजली वस्त्रे,रतन कसबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
…या मीटिंगमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकसंघ करून आगामी निवडणुकीला सामोरे जाणे, संयुक्तपणे संपूर्ण तालुका दौरा करणे, इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागवून मुलाखती घेणे, महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत आवाज उठवून सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करणे, शेतकरी कर्जमाफी, महागाई, ऊस दराबाबतीत संभ्रम, सरकारचे शेतीमाल धोरण, बिघडलेला सामाजिक समतोल,वाढलेला भ्रष्टाचार तसेच जनतेत सरकार विरोधात असलेला असंतोष इत्यादी विषयांवर चर्चा करून धोरण ठरविले. मीटिंग दरम्यान मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

























