बार्शी – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम म्हणजे लोकाभिमुखतेचा उत्तुंग जागर आहे. मार्च महिन्यातील ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न झाला.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सभापती विजय गरड यांनी उपस्थित राहून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत मोदीजींचे विचार ऐकले, यावेळी संचालक रामेश्वर पाटील, रविकांत साळुंखे, सतिश हनुमंते, सचिव तुकाराम जगदाळे, आशिष काळे, दिपक जुगदार, आनंद चौधरी, बाबा मिरगणे, अजय देशमुख, राजाभाऊ खंबाळे, जगन्नाथ गाढवे, नवनाथ गिराम, गोकुळ मांजरे, विशाल खलसे, ज्ञानेश्वर जामदार तसेच शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी रेल्वे, विद्युत, गॅस, परिवहन, रस्ते, व्यापार, उद्योग, सौर ऊर्जा, जलविद्युत, शेती, गरीबांना घरे, भूमीपट्टा अभियान इत्यादी क्षेत्रात होत असलेल्या प्रगती बद्दल माहिती देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत २२ व्या हप्त्याचे ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ६४० कोटींचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र खानापारा, गुवाहाटी (आसाम) येथे पार पडला.

























