नामदार पालकमंत्री तथा खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा
संजय निकम
वाळूज महानगर ( तरुण भारत) :
मराठवाड्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील पंढरपूर येथे नामदार पालकमंत्री तथा खासदार संदिपान भुमरे यांच्या शुभहस्ते रात्री ११.३० वाजता तर सकाळी 5.30 वाजता वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांनी सपत्नीक विठुरायाची महापूजा व आरती केल्यानंतर भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले.
आषाढी एकादशीनिमित्त संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या पंढरपूर या गावी मराठवाड्यातील भाविकांसह परिसरातील परराज्यातील भाविक भक्त आणि वारकरी संप्रदायातील अनेक विठ्ठल भक्त या पंढरपुरात नगरीत येतात. वारकरी मंडळी आणि विठ्ठल भक्त या वाळूज औद्योगिक परिसरातील पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माई च्या दर्शनासाठी येतात,
या ठिकाणी शासनातर्फे पालकमंत्री किंवा खासदार हे हे विठ्ठल रुक्माई च्या महापूजेसाठी आवर्जून उपस्थित असतात या वेळेला पालकमंत्र्यांनी खासदार संदिपान भुमरे हेच असल्यामुळे त्यांच्या हस्ते दि. १५ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास महापूजा करण्यात आली.
तर १६ जुलै रोजी पहाटे 5.30 वाजता वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांनी विठुरायांची सपत्नीक पुजा व आरती केली. यानंतर सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी आणि परिसरातील भाविक भक्तांसाठी मंदिराच्या प्रवेशद्वार खुले करण्यात आले.
या महापूजेच्या वेळेस संस्थान चे अध्यक्ष राजेंद्र पवार , सचिव अप्पासाहेब झळके, पोनि जयंत राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, बाळासाहेब आंधळे , पोलीस कर्मचारी सय्यद चांद, योगेश शेळके, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी ३२ पोलीस कर्मचारी ३०० आणि होमगार्ड १५० असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



















