तभा फ्लॅश न्यूज/ नायगांव : महावितरण उपविभागा अंतर्गत येणाऱ्या ऐंशी गांवापैकी नायगांव, नरसी, मूगांव मरवाळी सह अन्य गावात ‘स्मार्ट मीटर’ लाव ण्याच्या नावांखाली विज ग्राहकांची सर्रास आर्थिक लूट सुरु असून, या प्रक्रियेमध्ये कोणतीही पारदर्शक ता, नियमबद्धता किंवा जबाबदारी नाही.व अनुभव शून्य, अशिक्षित युवकांकडून जबरदस्तीने मीटर लावले जात असून, जुन्या योग्य मीटरमध्ये बिघाड असल्याचे भासवून नविन मीटर बसवले जात आहेत आणि त्यासाठी विजकंजूमरकडून बेकायदेशीररीत्या अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले जात आहेत,असा गंभीर आरोप सामाजिक कार्य कर्ते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील महावितरण विभागातील ठराविक अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदार कंपनी नियम झुगारून काम करत असून, अशिक्षित व अल्पशिक्षित युवकांकडून केवळ वर्क ऑर्डरच्या नावाखाली ‘स्मार्ट मीटर’ लावण्याचे काम चालवले जात आहे. यामुळे मीटर मध्ये तांत्रिक चुका, वीज बिलांमध्ये गोंधळ यामुळे नायगांव तालुक्यातीलविजग्राहकांच्या मनस्तापाला सुरुवात झाली आहे.
एकाच व्यक्तीकडून सर्व कामांची जबाबदारी?
वीज मीटरचे बसवणे, वाचन (रीडिंग) घेणे आणि फॉल्टी मीटर बदलणे, ही तिन्ही कामे एका व्यक्तीकडून करवून घेण्यात येत आहेत, ही बाबच महावितरणच्या कार्यपद्धतीवर मोठा सवाल उप स्थित करणारी असुन. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार,
विज ग्राहकाचे जुने मीटर व्यवस्थित असूनही ‘तो बिघडला आहे’ असा बनाव रचून, नविन मीटर बसवले जात आहेत. त्यासाठी ग्राहकांकडून काही रुपयांची मागणी ही केली जात आहे, ही थेट लाच लुचपतच ठरते.
महावितरण विभागातील अधिकारीच कंत्राटदारा च्या पाठीशी?
महावितरणचे काही वरिष्ठअधिकारी कंत्राटदाराच्या बाजूने वागत असून, या गैरप्रकारांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सामाजिक कार्य कर्ते प्रभाकर शिंदे यांनी केला. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित एजन्सीचे कंत्राट
तात्काळ रद्द करावे,ती एजन्सी काळ्या यादीत टाकावे , आणि महावितरण विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आर्थिक लुटी विरोधात आता जनआंदोलन उभं राहत असून, १४ ऑगस्टपासून अधीक्षक अभियंता महावितरण, नायगांव यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. “ग्राहकांच्या खिशावर डल्ला टाकणाऱ्या या लुटारू कंत्राटदाराला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची हीच वेळ आहे,” असे ते यावेळी म्हणाले.