तभा फ्लॅश न्यूज/माहूर : माहूर पोलिसांनी पोलिस अधीक्षक पथकासोबत आज मध्यरात्री केलेल्या एका संयुक्त कारवाई दरम्यान तालुक्यातील हडसनी येथील एकाच्या घरासमोरील अंगणात अवैधरित्या विनापरवाना ताश पत्ते अंदर बाहर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत असताना ८ जणांना रंगेहाथ पकडले. या धाडीत रोख रक्कम २ हजार ५० व जुगार साहित्य पोलिसांनी हस्तगत करत केले असून,त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडसनी येथील एकाच्या घरासमोरील अंगणातील जनावरांचे गोठ्यात काही जण ताश पत्ते जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड आणि पोलिस अधीक्षक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक ए.वि.डाके यांनी पोका. सोनटक्के, अमोल राठोड यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन संयुक्त धाड टाकत ताश पत्ते जुगार खेळणाऱ्या ८ जणांना रंगेहात पकडले. त्यांचेकडून ताश पत्ते जुगार साहित्यासह रोख रक्कम २ हजार ५० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विशेष म्हणजे सर्वच्यासर्व ८ ही आरोपी हे स्थानिक हडसनी येथील रहिवाशी असून त्यातील व्यवसायाने चौघे हे शेतकरी, एक मजुरी, एक व्यापारी आणि दोघे हे शिक्षण घेत असलेले विद्यार्थीदशेतील तरुण आहेत.
पोकॉ दत्ता सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे माहूर येथे त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत यातील कोणासही अटक करण्यात आली नसून, नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती पोउनि अन्येबोईनवाड यांनी दिली आहे. या कारवाईचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी हे करीत आहेत.