पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव व आसपासच्या परिसरात नवीन वर्षांतील हिंदु संस्कृतीमधील पहीला पवित्र मकर संक्रांतीचा सण महीलांनी मोठया उस्हात साजरा करण्यात आला.यंदा वाणवसा करण्याचा मुहुर्त दुपारी तिननंतर पिलीव व आसपासच्या परीसरातील मंदिरात महीलांनी मोठी गर्दी केली होती.दुपारी तिननंतर पिलीव परीसरातील सर्वच रस्त्यावर महीलांची प्रचंड गर्दी दिसुन येत होती.
महीला अलंकार व नवीन साड्या परिधान करुन मंदिरात देवदर्शनासाठी आल्या होत्या. देवदर्शनानंतर महीला एकमेकींना हळदी _ कुंकू लावुन वाणवसा देत तिळगूळ देत एकमेकींना शुभेच्छां देत होत्या. तर पुरुष वर्ग लहान _ मोठ्यांना तिळगूळ देऊन एकमेकांना आशीर्वाद देत होते.आजपासून रथसप्तमी पर्यंत महीलांना घरी बोलावुन हळदी _ कुंकू लावुन आपल्या ईच्छेनुसार भेट वस्तु देणयाची परंपरा अनेक वर्षांपासूनची हिंदु संस्कृती आहे .
पिलीवसह ,कुसमोड, झिंजेवस्ती, सुळेवाडी व आसपासच्या परिसरात हा मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोशल मिडीयावरून दिवसभर एकमेकांना शुभेच्छा देत होते.






















