मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. यासंदर्भात 9 तारखेपर्यंतची डेडलाईन दिली आहे.
जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येत्या 9 तारखेला सरकारला दिलेल्या मुदतीचे 15 दिवस पूर्ण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
👉🏻 जरांगे पाटलांच्या नव्या मागण्या :
▪️येत्या 9 तारखेपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करा.
▪️अंतरवलीतील मराठा आरक्षण संदर्भातील गुन्हे मागे घेणे.
▪️सगेसोयऱ्याच्या कायद्याची प्रक्रिया सुरु करा.
▪️1884चं हैदराबादचं गॅझेट स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा द्या.