जालना – बुलेट दुचाकी वाहनाच्या सायलेन्सर मध्ये बदल करत कर्णकर्कश आवाज काढणे व मोठमोठे फटाके फोडणार्या बुलेट राजांसह 4 दुचाकी वाहनांवर दिनांक 30 शुक्रवार रोजी कारवाई आली. सायलेन्सर जप्त करून सहा हजार रुपये दंडात्मक कारवाई.
सायलेन्सर बदलून कर्णकर कक्ष तसेच फटाके फोडणाऱ्या बुलेटची माहिती मंठा पोलिसांना द्यावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन मंठा पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांनी केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या पथकातील संतोष माळगे, जगन्नाथ सुक्रे, आनंद ढवळे, संतोष बनकर, सतीश आमटे,रवी जाधव, श्रीकांत काळे, समाधान खाडे यांनी केली.




















