राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक घडामोडी सुरु असतानाच आता मराठा आरक्षण सर्वेक्षणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सरकारने मुदतवाढ नाकारली आहे.
त्यामुळे शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत 2 कोटी 12 लाखांहून अधिक घरांचा सर्वे पूर्ण झाला आहे.
या सर्वेक्षणाचा शुक्रवार अखेरचा दिवस असून या सर्वेक्षणाचा अहवान शनिवारी सुपूर्द करणं अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव यांची ऑनलाईन बैठकही पार पडली. या बैठकीत संपूर्ण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला आहे.