माळशिरस – तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात असून सर्वत्रच ओल्याच्या चाऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याने उसाचे वाडे घेण्यासाठी सदाशिवनगर येथे शेतकऱ्यांची झुंबड उडत असून काही ठिकाणी असणाऱरा ओला चारा (मकवन) घेण्यासाठी पशुधन शेतकरी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यात शेळी एक लाख ६७ हजार ३५५ ,मेंढ्या ३२ हजार ८०६ ,गाय १ लाख ४६ हजार ७८३,म्हैस ७६ हजार २२८ असे एकूण २ लाख २३ हजार ११ पशु धन आहे.तालुक्यात मे महिन्यात पाऊस झाला त्यानंतर शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी मका पिकास पसंती दिली .ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये पेरणी केलेली मका यापूर्वीच कापणीला येऊन संपली आहे.तसेच तालुक्यात उस पिकाचे क्षेत्र मोठे आहे .परंतु सततच्या पावसामुळे ऊस पिकाची वाढ पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही .
मार्च ,एप्रिल पर्यंत चालणारे साखर कारखाने आत याच महिन्या बंद होतील,उस क्षेत्र संपले आहे.तसेच अनेक कारखान्यांनी ऊस कापणी साठी यंत्राचा वापर केला त्यामुळे उसाचे वाडे उपलब्ध झाले नाही.तालुक्यात बैलगाडीने उसाचे गळीत केले जात होते परंतु आता वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली.त्यामुळे बैलगाडी मालक आपल्या जनावरांना पुरेल असे वाडे ठेऊन जादा वाडे विकत होता .आता ते हि बंद झाले .दुध वाढीसाठी कोरड्या चाऱ्या बरोबर ओल्या चाऱ्याची आवशकता असते .
काही शेतकऱ्या कडे मका आहे त्याचा दर आता २२ शे २५ शे गुंठ्याला झाला आहे.काही वाहन चालक लासुर्णे ,पाडेगाव आदी ठिकाणी असणाऱ्या गुऱ्हाळावरून वाडे आणून विक्री करीत असून १०० रुपयास १६ पेंडी वाडे देत ते घेण्यासाठी शेतकरी वर्ग गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
















