बार्शी – एमआयटी आर्ट्स कॉमर्स & सायन्स कॉलेज बार्शी येथे दि. ७ ते ९ जानेवारी दरम्यान क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन चव्हाण यांच्या हस्ते व एम. आय. टी. विश्वशांती गुरुकुल स्कूलचे प्रिन्सिपल आनिष नाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या क्रीडा स्पर्धेत सांघिक प्रकारामध्ये क्रिकेट, खो खो, कबड्डी आणि लगोरी तर मैदानी स्पर्धेत १०० मी धावणे, गोळाफेक, थाळीफेक, या मैदानी खेळांचा समावेश होता. त्याचप्रमाणे बुद्धिबळ आणि कॅरम इत्यादी खेळांचा समावेश होता. खेळामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे बदल घडून त्यांच्यात खिलाडूवृत्ती व नेतृत्व गुण विकसित होण्यात मदत होते, असे प्रतिपादन डॉ. सचिन चव्हाण यांनी उद्घाटनावेळी केले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अमोल मिरगणे तसेच महाविद्यालयातील इतर प्रा. जगनाडे व प्रा. बोंडगे आदींनी नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिकेत कारंडे यांनी तर आभार प्रा. सोनवणे यांनी मानले.

















