देगलूर – येथील प्रभाग क्रमांक अकरा मधील मोहम्मद आदिल मित्र परिवार आणि सय्यद निसार भाई मित्र मंडळ, देगलूर यांच्या वतीने नवनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रतिनिधी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच भावी शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे, नगरसेवक नंदुसेठ शाखावार, नगरसेवक अनिल बोन्लावार, नगरसेवक पाशा भाई शेख, नगरसेवक प्रतिनिधी शुभम लक्ष्मीकांत पदमवार, नगरसेवक प्रतिनिधी सुमित कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी सय्यद अजिज भाई, शशिकांत टेकाळे, माधव फुलारी, पिंटु जोशी आणि इतर मान्यवरांचे नगरपरिषदेत मिळालेल्या विजयाबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे म्हणाले, आपण सर्वांनी माझी सौभाग्यवती विजयमाला बालाजी टेकाळे आणि माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ज्या विश्वासाने विजयी केलात त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. आपल्या सर्वांच्या अडीअडचणीत आणि सुखदुःखात टेकाळे परीवार सदैव राहील. देगलूरचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

























