सोलापूर , 20 फेब्रुवारी (हिं.स.) लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते पाटलांचे तिकीट पक्के आहे, कोणी नाही लढले तर मी स्वतः लढविणार असल्याचे वक्तव्य सहकारमहर्षीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी केले. मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणारच असल्याचा निर्धार व्यक्त केल्याने माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा भाजपमध्ये असलेला तिढा काही केल्या सुटायचे नाव घेताना दिसत नसून यावर भाजप काय निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सदाशिवनगर (ता.माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या कारखान्याच्या २१ पैकी १९ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्या उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत जयसिंह मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखवला. जयसिंह मोहिते-पाटील हे मोहिते-पाटील घराण्याचे निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे जयसिंह यांच्या दाव्याला विशेष महत्त्व आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...