वैराग – जामगांव (पा) (ता. बार्शी): येथील ‘एकता महिला मंच’ च्या वतीने त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आज, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, जामगांव (पा) गावात पहिल्यांदाच एकता महिला मंचच्या पुढाकाराने माता रमाबाईंची जयंती साजरी झाल्याने महिला वर्गात मोठा आनंद पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. एकता महिला मंचच्या सदस्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
या ऐतिहासिक क्षणी एकता महिला मंचच्या अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या. यामध्ये पल्लवी भालेराव, मानसी भालेराव, मिलन भालेराव, विजया गायकवाड, कांता गायकवाड,लक्ष्मी भालेराव,वंदना पाचकुडवे,सरस्वती पाचकुडवे, यांसह गावातील इतर महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माता रमाबाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संघर्षमय प्रवासात दिलेली साथ आणि त्यांचे बलिदान समाजासाठी प्रेरणादायी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी आणि महिलांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी एकता महिला मंचने या जयंतीचे आयोजन केले होते. गावात पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

















