अकलूज – रस्त्याच्या कडेला ऊसाने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टर ट्रेलरला मोटरसायकल ची धडक बसून एक जणांचा मृत्यू झाला.
अकलूज येथील युवक अरबाज नजीर तांबोळी वय 21 यांचे एका दुर्दैवी अपघातात निधन झाले. सोमवारी रात्री तो कराड गावावरून 16 पीर या देवस्थान वरून अकलूज कडे येताना माळशिरस जवळ गारवाड पाटी जवळ उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रेलर ला धडकून मुर्त्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण अकलूज परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.तरुण वयातच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या पश्चात वडील नजीर गुलाब तांबोळी, आई जरीना नजीर तांबोळी आणि विवाहित बहीण महेक अल्ताफ तांबोळी असा परिवार आहे. घरातील कर्ता तरुण सदस्य गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माळशिरस पोलीस ठाण्यामध्ये याबाबत अपघाती नोंद झाली आहे























