करकंब – शनिवार दि.७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांमध्ये होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच कायदा व सुव्यवस्था अबधीत राहावी या उद्देशाने करकंब व भोसे गावातील प्रमुख मार्ग, बाजारपेठा, चौक, मिश्रवस्ती मधून हे पथसंंचालन (रूट मार्च) करण्यात आले.
सदर पथसंचलनामध्ये करकंब पोलीस ठाणे हद्दीतील २ पोलीस अधिकारी,१० पोलिस अंमलदार,२५ होमगार्ड सहभागी झाले होते.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,पंढरपूर उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (भारतीय प्रशासन सेवा) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने हे पथसंंचलन केले.
यावेळी मतदार व नागरिकांनी शांततेत व कायद्याचे पालन करत मतदान करून.पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान करकंब पोलीस स्टेशन प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.
















