Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रमाचा समारोप

तरुण भारतbyतरुण भारत
January 23, 2026
in social
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : तळे हिप्परगा येथील नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत फ्रान्समधील नामांकित अभियांत्रिकी संस्था ‘इन्स्टिट्यूट सुपारीयो दे मेकॅनिक द पॅरिस (ISAE SUPMECA)’ यांच्यासोबत सप्टेंबर 2025 मध्ये सामंजस्य करार केला आहे.

सेंट-ओएन, पॅरिस येथे स्थित असलेली ही संस्था व्यावसायिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक क्षेत्रात अग्रगण्य मानली जाते. या कराराअंतर्गत संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, प्रकल्प-आधारित शिक्षण तसेच विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण यावर विशेष भर देण्यात आला आहे. दरवर्षी दोन्ही संस्थांकडून जास्तीत जास्त सहा विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करता येणार असून, इंटर्नशिपचा कालावधी कमाल 06 महिने (दोन सत्रे) असा असेल.

या करारानुसार इन्स्टिट्यूट सुपारीयो दे मेकॅनिक द पॅरिस येथील चार विद्यार्थ्यांनी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथे पाच महिन्यांची इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली. जोना ब्रुआस, अ‍ॅड्रियन लस्ट, निकोलस बोर्त व व्हिक्टर हॉर्मंड यांनी ऑर्किड महाविद्यालयाच्या 16 भारतीय विद्यार्थ्यांसोबत मेकॅट्रॉनिक्स व एअरोस्पेस क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांवर काम केले. यामध्ये एआय-नियंत्रित सौरऊर्जेवर चालणारे सेल्फ-बॅलन्सिंग वाहन, पिक अँड प्लेस रोबोट, क्वाडकॉप्टर ड्रोन तसेच एअरोस्पेससाठी हलके व जैवविघटनशील (इको-कॉम्पोझिट) साहित्य विकास प्रकल्पांचा समावेश होता.

इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांनी सिस्टम इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून थ्रीडी डिझाईन, मॉडेलिंग, एफईएम/एफईए विश्लेषण, साहित्य अभ्यास व ग्राहक सर्वेक्षण यांसारखी प्रगत कौशल्ये आत्मसात केली. तांत्रिक ज्ञानासोबतच आंतरवैयक्तिक कौशल्ये, व्यवस्थापन क्षमता व आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीमवर्कचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. या सर्व प्रकल्पांचे मार्गदर्शन उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास एस. मेतन व डॉ. व्ही. एस. हिरेमठ यांनी केले. इन्स्टिट्यूट सुपारीयो दे मेकॅनिक द पॅरिस विद्यार्थ्यांची सोलापूरमध्ये झालेली ही पहिलीच पाच महिन्यांची दीर्घकालीन इंटर्नशिप ठरली आहे.

या प्रकल्पांच्या गुणवत्ता व नवोन्मेषाची दखल घेत ला फोंडेशन डसॉल्ट सिस्टिम्स यांनी पुढील टप्प्यातील उत्पादन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, हे प्रकल्प आता ऑर्किड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे विकसित करण्यात येणार आहेत.

पाच महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रमाचा समारोप महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमामुळे सोलापूरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन व नवोन्मेषाचे दालन खुले झाले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असिस्टंट सुप्रिटेंडन्ट ऑफ पोलीस, सोलापूर राहुल आत्राम यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात मेकॅट्रॉनिक्स क्षेत्रातील आंतरशाखीय प्रकल्पांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. आजच्या जागतिक औद्योगिक गरजा, तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल व सद्यःकालीन आव्हाने पेलण्यासाठी यांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचा एकत्रित सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आयआयटी पदवीधर म्हणून भारताच्या तांत्रिक व औद्योगिक विकासात या दोन शाखांची निर्णायक भूमिका त्यांनी स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे त्यांनी विशेष कौतुक करत या महाविद्यालयाच्या परदेशी विद्यापीठांशी असलेल्या सहकार्य व उत्पादन विकासाभिमुख दृष्टिकोनाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे यांनी ऑर्किड महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीयीकरण धोरणाचा सविस्तर आढावा घेतला. परदेशी विद्यापीठांसोबत राबविण्यात येणाऱ्या ट्विनिंग प्रोग्राम्स, संयुक्त शैक्षणिक उपक्रम व संशोधन सहकार्याचा भविष्यातील रोडमॅप त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अभियंते घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उपप्राचार्य व कार्यक्रम समन्वयक डॉ. श्रीनिवास एस. मेतन यांनी या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रमाच्या पाच महिन्यांच्या प्रवासाचा सविस्तर अहवाल सादर केला. फ्रान्समधील विद्यार्थ्यांनी चार भारतीय विद्यार्थ्यांसोबत संयुक्तपणे केलेले तांत्रिक प्रकल्प, शैक्षणिक सहकार्य, कार्यसंस्कृतीतील फरक तसेच आंतर-सांस्कृतिक देवाणघेवाण याविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच ऑर्किड महाविद्यालयाच्या युरोपियन व गल्फ देशांतील विद्यापीठांशी भविष्यातील सामंजस्य करार करण्याच्या योजनांवरही त्यांनी प्रकाश टाकला. या आंतरराष्ट्रीय उपक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व सचिव विलास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठिंबा, मार्गदर्शन व प्रेरणेबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

या समारोप कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर राहुल देशपांडे, डॉ. ए. बी. मगर, सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच आयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. ए. बी. मगर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वर्षा शिरसागर व कु. वैष्णवी माशाले यांनी केले. या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून ऑर्किड टीमने अथक परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

परस्पर देवाणघेवाणीअंतर्गत ऑर्किड महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी 16 फेब्रुवारी 2026 रोजी इन्स्टिट्यूट सुपारीयो दे मेकॅनिक द पॅरिस येथे चार महिन्यांच्या पूर्ण शिष्यवृत्तीवर आधारित इंटर्नशिपसाठी जाणार आहेत. तसेच मागील तीन वर्षांत पॉलिटेक नॅन्सी येथील सात फ्रेंच विद्यार्थ्यांनी सोलापूरमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली असून, त्याच कालावधीत ऑर्किड कॉलेजचे सहा विद्यार्थी फ्रान्समध्ये पूर्णतः अनुदानित इंटर्नशिपसाठी गेले आहेत.ही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देवाणघेवाण सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत असून, जागतिक पातळीवरील अनुभव, रोजगारक्षमता व संशोधनाभिमुख दृष्टिकोन वाढविण्यास मोठी मदत करत आहे. गेल्या दहा वर्षांपासून ऑर्किड कॉलेज परदेशी विद्यापीठांशी सहकार्य व स्टडी अब्रॉड मार्गदर्शनासाठी ओळखले जात असून, जागतिक दर्जाचे अभियंते घडविण्याच्या दिशेने हे इंडो-फ्रेंच सहकार्य एक भक्कम पाऊल ठरत आहे.

Post Views: 42
Previous Post

हेल्मेट – सीट बेल्टचा संदेश देत रस्ता सुरक्षा रॅली

Next Post

सोलापूर जनता सहकारी बँक पाच्छा पेठ शाखेचे वर्धापन दिन संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर जनता सहकारी बँक पाच्छा पेठ शाखेचे वर्धापन दिन संपन्न

ताज्या बातम्या

शॉकसर्किटने आग; लाखांचे नुकसान 

शॉकसर्किटने आग; लाखांचे नुकसान 

March 11, 2026
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी विकास कस्तुरे

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी विकास कस्तुरे

March 11, 2026
20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

March 11, 2026
मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

March 11, 2026
बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

March 11, 2026

अबब ! उन्हाचा पारा वाढला.. #hightemperature #temperature #viral #tranding #popular

March 11, 2026

मनपाच्या महिला महोत्सवात ४० बचत गटांचा सहभाग. #public #marathinews #viral

March 11, 2026

दादांच्या आठवणीने वाहिले सुनेत्रा पवारांच्या डोळ्यातून अश्रू. #public #marathinews #solapurnews

March 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724146

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697