*मौजे केशेगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे यांचा सेवापुर्ती निमित्त भव्य नागरी सत्कार.*
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
*इटकळ ( दिनेश सलगरे ):- मौजे केशेगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे यांचा सेवापूर्ती निमित्त केशेगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार शनिवार दि.६ जुलै रोजी इटकळ येथील साई मंगल कार्यालय येथील आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
रविवार दि.३० जुन रोजी मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी येथुन सेवानिवृत्त झाले म्हणून केशेगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. इटकळ येथील साई मंगल कार्यालय येथे हा सेवापूर्ती सोहळा शनिवार दि.६ जुलै रोजी मोठया उत्साहात संपन्न झाला. या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामचंद्र दादा आलूरे हे होते तर सेवानिवृत्त प्राध्यापक भिमाशंकर बिराजदार , प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, गटशिक्षण अधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी , मेहरूनिसा ईनामदार , अँड. नागनाथ कानडे , डॉ. जितेंद्र कानडे , विस्तार अधिकारी तात्यासाहेब माळी , मल्लिनाथ काळे , प्रभाकर बोंगरगे सर , माजी सभापती कल्याणराव पाटील, सरपंच मल्लिनाथ गावडे , उपसरपंच लक्ष्मण क्षिरसागर , काशिनाथ शेटे , राज पाटील , सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथीचा जळकोटे परिवाराचा वतीने सन्मान करण्यात आला
त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक संगमेश्वर जळकोटे यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करतांना नागनाथ जळकोटे सर यांच्या शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्याविषयी माहिती दिली त्यानंतर केशेगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मल्लिनाथ गावडे व मान्यवरांच्या हस्ते सेवापूर्ती निमित्त नागनाथ जळकोटे सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थित शिक्षक मित्र व मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे यांच्या शैक्षणिक कार्याच्या योगदानाविषयी माहिती देत शुभेच्छा दिल्या.सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे सर यांनी मनोगत व्यक्त करतांना उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक बंधू ग्रामस्थ व मित्र परिवाराचे आभार मानले. त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र आलुरे यांनी केशेगाव ग्रामस्थांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
हा सेवापूर्ती सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अशोक साखरे , नेमिनाथ जळकोटे, नामदेव गायकवाड , दिनेश सलगरे , संगमेश्वर जळकोटे सर, शिवशंकर जळकोटे सर, महादेव पाटील सर , चिदानंद हांद्राले, अरूण साखरे , सरपंच मल्लिनाथ गावडे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन पत्रकार दिनेश सलगरे यांनी केले तर आभार शिवशंकर जळकोटे सर यांनी मानले.*