सोलापूर : येथील डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात ‘नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ’ आणि संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल स्टार्टअप डे च्या निमित्ताने “सोलापुरातील उद्योग व्यवसाय आणि पीच प्रस्तुती” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी योगिन गुर्जर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. विद्यार्थ्यांना सोलापुरातील वस्त्रोद्योग आणि कृषी यांसारख्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची माहिती देणे, तसेच ‘बिझनेस पीच’ (व्यावसायिक सादरीकरण) करण्याचे कौशल्य शिकवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
गुर्जर यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योग विश्वाची स्पष्ट समज मिळाली आणि त्यांच्यामध्ये व्यावसायिक कल्पना मांडण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी हे होते. त्यांनी व्यावसायिक कल्पना आणि त्याची प्रत्यक्ष कार्यवाही याविषयी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. आर.एच. कुलकर्णी आणि प्रा. एल.सी. मूशन यांनी कार्य केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


























