नांदेड / हाणेगाव : हाणेगाव येथे मरखेल पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस व तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मरखेल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र हुंडेकर यांनी आपल्या सहकार्यासोबत या विभागात या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करून अनेकांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास विनंती केली आणि या विनंतीला अनेक सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील पदाधिकारी उद्योजक ,व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, व युवा वर्ग तसेच बालक वर्ग उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला यावेळी हाणेगाव येथील वझर टी पॉइंट येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांना रवींद्र हुंडेकर यांनी राष्ट्रीय एकता दिवस व तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याविषयी माहिती दिली तर यावेळी चलवे सर यांनी पण उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले आणि सर्व लहान बालक मुले मुली व युवा वर्ग यांचे सह धावण्याची शर्यत ठेवण्यात आली व प्रथम पारितोषिक द्वितीय ,तृतीय ,आलेल्या छोट्या बालकांना युवा वर्गांना मरखेल पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले यावेळी हाणेगाव विभागातील सर्वच क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आवर्जून सर्व गावचे पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी कु, केशवी राजेश पंधरगे,अंजली अक्कमगिरे, यांनी प्रथम द्वितीय पारितोषिक मिळविले तरी या कार्यक्रमाला विवेक पडकंठवार, दिलीप बंदखडके, डॉ, व्ही व्ही धुमाळे, मुक्तार पाटील, मौलाना सज्जाद खासमी ,राजेश पंधरगे प्रा, प्रभाकर भालके संजय काडगे पुरुषोत्तम अंसापुरे, प्राचार्य फुलसिंग राठोड, संतोष राठोड ,वसंत आडेकर , मोसिन मुजावर, सौ,मनीषा संजय वसुरकर पोलीस पाटील, ज्योती गोखले पोलीस पाटील वझर, गजेंद्र पाटील लोणी, एकनाथ रेडी मरतोळी तानाजी देवकते, कविता अशोक दोगाले बीजलवाडी, सिंधुताई धर्मावाड येडूर, संदीप बाळासाहेब देशमुख शिळवणी, आदी जण उपस्थित होते तर या कार्यक्रमाचं आयोजन हाणेगाव दूरपरिक्षेत्राचे जमादार दत्ता पाटील नारायण यंगाले यांनी सुंदर असं नियोजन केले तर सर्व मान्यवरांच्या वतीने मरखेल पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक रवींद्र हुंडेकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
 
	    	 
                                




















 
                