बार्शी – पाच दिवसांचा आठवडा या करारानुसार मान्य केलेल्या मागणीची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, या दीर्घकालीन प्रलंबित मागणीसाठी आज बँकिंग क्षेत्रातील UFBU या शिखर संघटनेंतर्गत नऊ संघटनानी देशव्यापी संप पुकारला होता.
बार्शी येथे कार्यरत असलेल्या बँक कर्मचारी समन्वय समितीने तालुकास्तरावर निदर्शने करण्याचे आयोजन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून बार्शी शहर व तालुक्यातील सर्व बँकेतील अधिकारी व कर्मचारी बँक ऑफ इंडिया, शाखा बार्शी येथे आपला निषेध व्यक्त करण्यासाठी जमले होते. त्या ठिकाणी आपल्या पाच दिवसांचा आठवडा या प्रलंबित मागणीसाठी जोरदार घोषणा आणि निदर्शने करण्यात आली आणि आपली मागणी लवकरात लवकर मान्य करावी नाहीतर हा लढा यापुढे अजून तीव्र करण्यात येणार असे सांगितले.
बार्शी समन्वय समितीतर्फे समन्वयक कॉ. सरिता कुलकर्णी, अध्यक्ष कॉ. राहुल मांजरे यांनी मार्गदर्शन केले. तर विविध बँकेतून सुरज गोडगे युनियन बँक, विक्रम निचळ सेंट्रल बँक, अंकित केडिया महाराष्ट्र बँक, अमित काळदाते, सुदर्शन अग्निहोत्री, विशाल तांबडे यांनी आपली मते व्यक्त केली. कॅनरा बँक नितीन, शैलजा गुप्ता स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डिजीटल बँकिंगचे इतके ढोल वाजवले जात असताना रिझर्व बँक, एलआयसी, नाबार्ड, आयटी क्षेत्र या सर्वप्रमाणे बँक कर्मचाऱ्याची मान्य केलेला पाच दिवसांचा आठवडा त्वरित अंमलात आणला पाहिजे ही सर्वांची आग्रही मागणी होती .

























