राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात
पुणे, 17 जुलै (हिं.स.)। आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडल्यानंतर अजित गव्हाणे यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.गव्हाणे यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते, कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी महापौर वैशाली घोडेकर, हनुमंत भोसले, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, गीता मंचरकर, अनुराधा गोफणे, शुभांगी बो-हाडे, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, संजय नेवाळे, वसंत बोराटे,
संजय वाबळे, समीर मासुळकर, घनश्याम खेडेकर, तानाजी खाडे, शशिकीरण गवळी विशाल आहेर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे यांनीही प्रवेश केला. माजी महापौर आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे यावेळी उपस्थित होते.मागील दहा वर्षांत भोसरीत बकालपणा वाढला आहे. विकास कामात भोसरी पाठीमागे राहिली. आमदार महेश लांडगे यांनी विकास केला नाही. मला भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. परंतु, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार, असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. भाजपसोबत राहून मी निवडणूक लढवू शकत नसल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.