छत्रपती संभाजीनगर – गंगापूर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला.
या यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पक्षाने ठोस पावले उचलावीत हा आहे.
या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ तुकाराम सटले, विशाल दारुंटे, गणेश चव्हाण, सुरेश बोर्डे, रविराज लाड, चिन्मय कुलकर्णी, स्वप्निल मस्के, संदीप पानखडे, शुभम राजपूत, अमीर सोहेल आणि जालिंदर पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
या प्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच आवाजात निर्धार व्यक्त केला की, गंगापूर शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विकासाचा संदेश पोहोचवला जाईल, प्रत्येक प्रभागातील समस्या समजून घेतल्या जातील, आणि त्या समस्यांचे समाधान करण्यासाठी पक्ष सदैव अग्रभागी राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या सोबत उभा राहिला आहे आणि या जनसंवाद यात्रेद्वारे पक्ष पुन्हा एकदा जनतेच्या मनाशी संवाद साधत आहे.


















