बार्शी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कर्तृत्व तरुणांसाठी प्रेरणादायी असून राष्ट्र उभारणीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अनमोल आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य रवींद्र वायकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महादेव राऊत यांनी केले.
पुढे शिक्षणाधिकारी जगताप यांनी नेताजींच्या शिस्तबद्ध आयुष्याचा आणि ध्येयवादी विचारांचा वारसा आजच्या पिढीने जोपासावेत. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजींनी युवकांचा सहभाग वाढवला, असे ही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य रवींद्र वायकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस आदर्श असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या गुणांना आकार दिला पाहिजे, असे त्यांनी मत मांडले.
याप्रसंगी प्रा. विठ्ठल गुंजाळ, प्रा.नरेंद्र शिंदे, प्रा. संतोष भोसले, प्रा. अविनाश शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. आरती पवार यांनी केले, तर आभार प्रा. राजेश भोसले यांनी मानले.


























