पंढरपूर – व्यापारी महासंघ,पंढरपूर व व्यापारी कमेटी पंढरपूर यांच्या वतीने माघी यात्रेत निमित्त शहर पोलीस स्टेशन येथे विविध प्रश्नांवर मिटींगचे आयोजन केले होते. यावेळी पंढरपूर शहराचे नुतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांचा शहरातील व्यापाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूर शहरातील विषेशत : प्रदक्षिणा मार्ग व मंदिर परीसरातील फेरीवाले, पथारीवाले यांचे रस्त्यावरील अतिक्रमण तसेच बेशिस्त वाहतूक यावर चर्चा झाली,आणि व्यापारी महासंघाने मागणी केली की रस्त्यावरील पथारीवाले फेरीवाले यांचे अतिक्रमण त्वरीत हटवावे असे देखील व्यापारी बांधवाकडून त्यांना सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी तात्काळ पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाँ. महेश रोकडे यांना फोन करून अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याचे मान्य करून संयुक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या बरोबरच २९ जानेवारी रोजी माघ एकादशी असल्याने २६ जानेवारी पासून शहरातील वाहतूक बंद करण्यात येणार आहे परंतू मंदिर परीसरातील व्यापारी वर्गासाठी फक्त २७ जानेवारी रोजी रात्री १० ते १२ वाजेपर्यंत छोट्या मालवाहतूक वाहनातून माल आणण्याची परवानगी दिली आहे,तरी मंदिर परीसरातील व्यापारी वर्गाने यांची नोंद घ्यावी असेही यावेळी व्यापार्यांना त्यांना आवाहन केले.
या बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, व्यापारी कमेटीचे अध्यक्ष महावीर फडे, चेअरमन राहूल म्हमाने, राजूशेठ भट्टड, प्रदिपभाई फडे, व्यापारी महासंघाचे सचिव शिरीष शेठ पारसवार, व्यापारी कमेटीचे सेक्रेटरी ईसाप्पा भिंगे आदींसह व्यापारी प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

























