नवीन नांदेड – वाघाळा शहर महापालिकेच्या शिक्षण व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी सिडको प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका सौ. निरंजनाताई राजू लांडगे यांची जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी राहुल कर्डिले यांनी एका बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
सिडको प्रभाग क्रमांक २० मधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून बहुमताने विजयी झालेल्या नगरसेविका सौ. निरंजनाताई राजू लांडगे यांची मनपाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षण व महिला बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांची निवड करण्यात आली. या बैठकीत शिक्षण व महिला बालकल्याण समिती उपसभापतीपदी सिडकोच्या नगरसेविका सौ. निरंजनाताई राजू लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे, शिलवान लांडगे, विशाल जोंधळे, दिलीप लांडगे, पप्पू सूर्यवंशी, अरुण भुते, मू. पठाण, गजानन कहाळेकर, गौतम पवार, सिद्धार्थ पवार, सौ.ममता लांडगे, दैवशाला वाघमारे, सुनीता पवळे, सीमा भुते, किरण यादव पत्रकार संभाजी सोनकांबळे सुरेश आंबटवार, शरद काटकर यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व समाज बांधवांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
























