केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, दहिवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर जी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले.
मागील १० वर्षांत आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-महायुती सरकारने तरुण, महिला यांच्यासह शेतकरी, गरिब अशा सर्व स्तरांतील प्रत्येकाच्या प्रगतीचा आणि सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त केला आहे, हे सांगून माढा लोकसभा मतदारसंघातील जनता यावेळीही गतीशील विकासाला प्राधान्य देत भाजप-महायुतीला विजयी करेल असा विश्वास श्री गडकरीजी यांनी व्यक्त केला.