तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : महापालिका आकृतीबंध २०२१ मध्ये व्यपगत झालेली झाडूवाले, बिगारी, सफाई कामगार, जमादार, आया आदी संवर्गातील ५०० पदे सुधारीत आकृतिबंधात करून पुर्नजीवीत करावीत या सहा विविध १० मागण्यांचे निवेदन सोलापूर महापालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने आयुक्तांना देण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे. मनपा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्यात वाढ करावी. सेवानिवृत्त सेवकांना ७ वे वेतन आयोगाचाः १ वर्षाचा वेतन वाढीला फरक व अर्जीत रजेची रक्कम देण्यासाठी पेन्शन विभागास दरमहा ५० लाख रूपये द्यावेत.
मनपामधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना दि.६ मार्च २०२५ च्या शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील झाडूवाले, बिगारी, सफाई कामगार सेवकांचे आय.सी.टी.. बेस्ड प्रणाली मार्फत कामाचे मुल्यमापन व क्यू. आर. कोड स्कॅन करणे पद्धत रद्द करावी. मनपामधील चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाईत ७५० रूपये व धुलाई भत्त्यात २५० रुपये वाढ करावी. घनकचरा व्यवस्थापनाकडील अर्हताकारी सेवा करून सेवानिवृत्त झाडूवाले, बिगारी, सफाई कामगारांना पेन्शन व उपदान अदा करावे. मनपा मधील कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा लागू करावा यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी समितीचे संस्थापक जनार्दन शिंदे, अध्यक्ष दिलावर मनियार , कार्याध्यक्ष बापुसाहेब सदाफुले, जनरल सेक्रेटरी चांगदेव सोनवणे आदी उपस्थित होते.
Post Views: 8