वळसंग – पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत तत्परतेने व प्रभावीरीत्या करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर गुन्हा गुन्हा क्रमांक 503/2025 हा चोरीचा गुन्हा असून या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चव्हाण यांनी अत्यंत कौशल्याने व तत्परतेने केला. तपासादरम्यान आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हस्तगत केलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज रोजी मूळ फिर्यादी
नाव – संगीता निलप्पा जेऊरे, रा. लिंबू चिंचोळी
यांना अधिकृतरीत्या परत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट, मा. श्री यामावर साहेब यांचे तसेच वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी राहुल डोंगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वळसंग पोलीस ठाणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व गुन्हेगारांविरोधात जलद व कठोर कारवाई करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.


















