सुस्ते – राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी सुस्ते येथील सप्तशृंगी पतसंस्थचे चेअरमन अतुल चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पंढरपूर तालुक्यातील सकल मातंग समाज बांधवांच्यावतीने देविदास कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांच्या कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या या सत्कार समारंभाच्या वेळी जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन धनंजय वाघमारे,शाहीर नंदकुमार पाटोळे,मुकुंद घाडगे,जयसिंग मस्के,पांडुरंग खिलारे,बापू वाघमारे,गणेश वाघमारे,राजु सकट,नागेश वाघमारे,तानाजी खिलारे इत्यादी प्रमुख पदाधिकारी यावेळी तालुक्यामधून उपस्थित होते.




















