सोलापूर : राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप तसेच नवनिर्वाचित नगरसेविका व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता समाजकल्याण केंद्र, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर शहर भाजपा अध्यक्षा रोहिणी तडवळकर उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी, जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कारभारी, जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सहसचिव शिवानंद बिराजदार, जिल्हा संघटक चिन्नया स्वामी, आदर्श मुख्याध्यापक सुनील पुजारी, जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा पाथरकर, शहराध्यक्षा वैशाली मेलगिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका कल्पना कारभारी व अर्चना नीलकंठ यांचा तसेच नूतन पदाधिकारी म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील व सहकार्याध्यक्ष शंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभात उपस्थितांना तिळगुळ वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्या रोहिणी तडवळकर यांनी समाजातील एकीचे महत्त्व अधोरेखित करत उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज उन्नती साधण्याचे आवाहन केले.
यावेळी शशिकांत जिद्दीमनी, निंगराज विंचुरे व ज्ञानेश्वर कारभारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली मेलगिरी यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रेया पाटील यांनी करून दिला. सत्कार कार्यक्रम सुरेश पाटील यांनी पार पाडला. सूत्रसंचालन मनोरमा जिद्दीमनी यांनी केले तर आभार मनीषा बोरगावकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद पुजारी, राजकुमार पुजारी, सोमेश पुजारी, पुष्पा गुरव, वंदना तळीखेडे, श्रेया पाटील, कविता स्वामी, अनिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी युवक-युवतींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























