अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे हे सलग सहाव्यांदा अक्कलकोट नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघ पुणे व प्रा.राहुल रुही मित्रपरिवार यांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना प्रा.राहूल रुही यांनी पुण्यातील प्रत्येक अक्कलकोट वासियांच्या सदिच्छा व पाठिंबा या महेश इंगळे यांच्या सोबत असून प्रत्येक कष्टकरी आणि मेट्रो शहरातील लोकांना श्री स्वामी समर्थांचा आणि चेअरमन महेश इंगळे यांचा मोठा आधार आहे.
नेहमी सर्व समाज बांधवांना त्यांचे सहकार्य आहे असे मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना प्रा.रूही यांनी या पुढेही नगरसेवक महेश इंगळे यांनी धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात गरूड भरारी घेत आपल्या यशाचा कमान दिर्घकाळ डौलाने मिरवावा याकरीता श्री स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राहुल रुही, अमेरिकेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.सुनील गायकवाड, सचिव चंद्रकांत शिंगे बनसोडे, उपाध्यक्ष अविनाश शिंगे, कार्याध्यक्ष रमेश वटार, रवी मुंदेनकेरी आदी उपस्थित होते.
फोटो ओळ – नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करताना प्रा.राहूल रुही, अमेरिकेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.सुनील गायकवाड व अन्य दिसत आहेत.


























