सोलापूर – अखिल भारतीय पद्मशाली संगम पश्चिम महाराष्ट्राच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचा जनसेना सोलापूर शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा मार्केट यार्ड, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. जनसेना सोलापूर शाखा अध्यक्ष श्रीनिवास यन्नम ऊर्फ (कामटे) यांच्या हस्ते डॉ. कोठे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्याचा गौरव केला. पद्मशाली समाजाच्या एकजुटीसाठी, समाजहिताच्या उपक्रमांसाठी तसेच युवकांना दिशा देण्याच्या कार्यासाठी डॉ. कोठे यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख उपस्थित वक्त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्र पातळीवर पद्मशाली समाजाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाला अखिल भारतीय ऑल इंडिया पद्मशाली संगम चे उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल , श्रीनिवास चिलका, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, माजी अध्यक्ष राकेश पुंजाळ ,निकेल यन्नम, श्रीनिवास बिटला, अनिल कोंडा, श्रीनिवास मंथेन, दत्तात्रय बंधगी, नरेंद्र बल्ला, राघवेंद्र शासम यांच्यासह जनसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साही व सकारात्मक होते. अखेरीस डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सर्वांचे आभार मानत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

























