सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या तेलाभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने ६८ लिंग पायी प्रदक्षिणा करणाऱ्या भाविक व भक्तांसाठी पी.बी. ग्रुपच्या वतीने दूध वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर स्थापित पाचवे गणपती मंदिर, (६८ लिंगांपैकी ३१ वे श्री पशुपती लिंग, देशमुख मळा) येथे पार पडला. पायी चालत येणाऱ्या भाविकांनी सुगंधी दुधाचा आनंद घेत समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी पी.बी. ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक माजी गटनेते आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, सुशील बंदपट्टे, विश्वनाथ बिडवे, कविता चंदनशिवे, सारिका फुटाणे, प्रतीक चंदनशिवे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मानाच्या नंदीध्वजाचे दर्शन घेतले.
या सामाजिक व धार्मिक उपक्रमात पी.बी. ग्रुपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाविकांची सेवा ही महत्वाची असल्याची भावना या उपक्रमातून दिसून आली. यात्रेच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले.


















