योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील मुख्य कार्यक्रमात योगाभ्यास केला.
यानंतर उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला. अनेक लोक त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, विविध तंत्र विकसित करतात त्याचप्रमाणे एकाग्रता वाढवण्यासाठी योग फायदेशीर ठरू शकतो असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. योग जेव्हा नैसर्गिकरित्या जीवनाचा भाग बनतो तेव्हा त्याचा लाभ प्रत्येक क्षणाला होतो., याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
जम्मू काश्मीरला योग साधनेची भूमी असं संबोधत योग हा काश्मीरसाठी रोजगाराचं एक माध्यम ठरू शकतं, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. रुणांशी साधत पंतप्रधानांनी त्यांची मतं जाणून घेतली.
कुटुंबासह योग या स्पर्धेचं या योग दिनानिमित्त आयोजन करण्यात आलं आहे.