सोलापूर – उद्धव नगर भाग- दोन परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन श्री प्रभाकर वाघमारे व सौ महानंदा वाघमारे यांनी केले आहे.
या कार्यक्रम सोहळ्यात सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत श्रीस्वामीच्या मूर्ती व पादुका अभिषेक,९ ते १२ वाजेपर्यंत हालचिंचोली व दिंडूर भजनी मंडळ यांचे कीर्तन, भारूड कार्यक्रम,१२ ते १२.३० पर्यंत स्वामींची महाआरती सोहळा व १ ते ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे नियोजन श्रीशैल कोरे, सुमित डिगे ,नामदेव कोरे,तुकाराम कोरे, वैष्णवी वाघमारे, मिनाक्षी कोरे, पूजा डिगे यांनी केले. सदर श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्यास सर्व स्वामी भक्तानी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वाघमारे कुंटुबियांनी केले आहे.

























