करमाळा: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मराठी व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपली मनोगते मांडली या स्पर्धेमध्ये विजेते झालेले प्रथम कु.शिवांजली कुदळे द्वितीय कु.नेहा मचाले व तृतीय कु.संजना मारडकर उत्तेजनार्थ श्री.विश्वभर लांडगे व कु. शबाना पठाण आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने सर, उपप्रचार्य डॉ. अनिल साळुंखे, प्रशासन अधिकारी श्री. संभाजी किर्दाक व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण ‘जीवन व कार्य’ या विषयावर डॉ. मुक्ता काटवटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय व सामाजिक कार्य अधोरेखित करत ते इतर राजकारण्यांपेक्षा कसे वेगळे ठरतात हे उदाहरणांसह स्पष्ट केले. आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. माने हे होते सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले सूत्रसंचालन डॉ. चारू देवकर आणि प्रा.विष्णू शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. वंदना भाग्यवंत यांनी मांनले.



























