सांगोला – श्री गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामी ३० वे मठाधिपती यांच्या आशीर्वादाने व श्री श्री श्री १०८ रुद्र पशुपती कोळेकर महाराज ३१ वे मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि.२५ मार्च रोजी स.८ वा. सांगोला तालुक्यातील कोळे मठातून कोळे ते शिखर शिंगणापूर या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर दिंडीमध्ये रेखाताई शिंदे सोमेश्वर देवस्थान हातीद, वीरभद्र देवस्थान नाझरे, रुद्र पशुपती भक्त मंडळ जवळा व श्री रुद्र पशुपती भक्त मंडळ केमवाडी या दिंड्या सामील होणार आहेत. तसेच श्री श्री श्री १०८ रुद्र पशुपती कोळेकर महाराज ३१ वे मठाधिपती हे पायी चालत निघणार आहेत. तरी शिवभक्तांनी कोळे मठात मंगळवार दि.२४ मार्च रोजी हजर राहावे असे आवाहन वीरशैव समाज, यात्रा कमिटी कोळे मठाचे चेअरमन यांनी केले आहे.























