पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव पंचायत समीती गणात भाजपने जलनायक शिवराज पुकळे यांच्या पत्नी नम्रता पुकळे यांना उमेदवारी दिली आहे .यामुळे खरेतर विरोधी गटापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे .शिवराज पुकळे हे गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी भागातील सुळेवाडी ,बचेरी ,शिंगोर्णी, काळमवाडी ,कोळेगाव, या दुष्काळी पट्ट्यातील गावांना शेतीसाठी निरा देवधरचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करीत आहेत.यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत .
गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज पुकळे यांचा हा लढा सुरु आहे .खरेतर भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनीही शिवराज पुकळे यांच्या ह्या लढ्याची दखल घेत .केंद्र व राज्य सरकारकडे या वंचित गावांचा समावेश केला आहे.यामुळेच आता ह्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जलनायक शिवराज पुकळे यांच्या धर्मपत्नी भाजपाकडुन पिलीव पंचायत समिती गणातुन निवडणूक लढवित आहेत.
दुष्काळी पट्ट्यातील सुळेवाडी ,बचेरी ,शिंगोर्णी, कोळेगाव या दुष्काळी पट्ट्यातील गावातील जनता याला पाठींबा देणार असे चित्र सध्या आहे.योगायोगाने केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाकडुन सध्या नम्रता पुकळे ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विरोधकांना नम्रता पुकळे याच्या उमेदवारीमुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.

























