वेळापूर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेळापूर येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती पंचशीलनगर २०२६ ची बैठक नुकतीच पार पडली. ही बैठक वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रजनीश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत जयंती समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सतीश कांबळे, उपाध्यक्षपदी जिवा लोंढे, खजिनदारपदी रणजित सरवदे, कार्याध्यक्षपदी विश्वजीत बनसोडे, सचिवपदी अजित लोंढे, संपर्क प्रमुखपदी अण्णा बनसोडे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी हर्षद बनसोडे व शंकर लोंढे यांची निवड करण्यात आली.
समिती सदस्य म्हणून आदेश मोरे, गणेश धांडोरे, शुभम बनसोडे यांची निवड करण्यात आली असून मार्गदर्शक म्हणून दिलीप बनसोडे, विजयभाऊ बनसोडे, रविराज गायकवाड, भैया बाबर हे कार्य पाहणार आहेत.
तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून नितीन लोंढे, राजकुमार बनसोडे, विलसन बनसोडे, रणजीत बनसोडे, सचिन उबाळे, हेमंत बनसोडे, शशिकांत लोंढे, अनिल कांबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य मिरवणुकीस सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जयंती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी समाजातील जेष्ठ , युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























