तभा फ्लॅश न्यूज/ नवीन नांदेड : शिवसेना शिंदे गटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गोपाळ चावडी येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित गजभारे यांनी दिनांक २८ जुलै २०२५ रोजी शिवसेना शिंदे गटात शिवसेनेचे उपनेते हेमंत पाटील व दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील भांडारकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्याशी पहिले पासूनच राजकारणात नाळ जुळलेली होती पंडित गजभारे हे यापूर्वीही हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय क्षेत्रात काम केलेले होते म्हणून पंडित गजभारे यांनी दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सिडको येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीस उपस्थित राहून हेमंत पाटील व दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील भांडारकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे दक्षिणचे पदाधिकारी सुहास खराने, विनय गिडे, मारुती धुमाळ, सतीश खैरे, राजेंद्र कुलते ,महिला आघाडीच्या स्मिता कुलकर्णी, गजानन राजुरवार, रावसाहेब तारू, बाळासाहेब देशमुख, सुधीर बागल, पप्पू गायकवाड यांच्यासह सिडकोतील शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पंडित गजभारे यांनी पक्षप्रवेश केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.