लोकसभा निवडणुक २०२४ मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम (ग्रेन गोडावून) रामवाडी याठिकाणी पार पडणार आहे. सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा होवु नये म्हणून शासकीय धान्य गोदाम कडे येणारे सर्व मार्ग बॅरीकेट लावून बंद करण्यात येणार आहेत. मतमोजणी प्रक्रियासाठी येणारे लोकसभा निवडणुक करीता उभे असलेले उमेदवार, मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी आणि इतर जनतेच्या वाहनांना ग्रेन गोडावुन परीसरात वाहनतळची व्यवस्था करण्यात आलेले आहे.
मोदी पोलीस चौकी ते मसिहा चौक पर्यंत येण्यास व जाण्यास मोदी पोलीस चौकी मार्गे रेल्वे बोगदा, ग्रेन गोडावुन मार्गे रामवाडी दवाखाना येण्यास व जाण्यास थोरली इरण्णा वस्ती ते ग्रेन गोडावुन मार्गे संपुर्ण रोड येण्यास व जाण्यास ,रामवाडी परीसरातुन ग्रेन गोडावूनकडे येणारे सर्व मार्ग येण्यास व जाण्यास, ग्रेनगोडाबुन पाठीमागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग येण्यास व जाण्यास, वाहन परवाना शिवाय इतर वाहनांना मतमोजणी परीसरात प्रवेश करणे बंद राहील.
दरम्यान वाहने पार्क करण्यासाठी केंद्रीय विद्यालय–शासकीय कर्मचारी व व्हिआयपी करीता , होमगार्ड मैदान-पुणेरोड, मंगळवेढ, तुळजापुर रोड, अक्कलकोट रोड या मार्गावरुन येणारे वाहन धारकांकरीता, हिंदू स्मशानभुमी रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको. तसेच पर्यायी मार्गाची व्यवस्थेमध्ये सातरस्ता ते रामवाडी कडे जाण्यासाठी सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक कुमार चौक रेल्वे स्टेशन भैय्या चौक – मरीआई चौक – नागोबा मंदीर मार्गे पुढे इच्छित स्थळी.
विजापुर रोडकडुन रामवाडी कडे जाण्यासाठी विजापुर रोड अशोक नगर नविन आरटीओ ऑफीस – नागुनारायणवाडी – सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे इच्छित स्थळी रेल्वे स्टेशन कडुन रामवाडी कडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन भैय्या चौक मरीआई चौक नागोबा मंदीर मार्गे पुढे इच्छित स्थळी असा मार्गात बदल करण्यात आला आहे.
त्याच पद्धतीने निवडणूक मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांना जांभवीर चौक ते मोदी चौकीदरम्यान रस्ता देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निकालानंतर रॅली किंवा रोडशो काढू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. एकंदर मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी तसेच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.