उमरी दि. 7 प्रतिनिधी
सध्या नायगाव विधानसभा मतदार संघात जाती जातीत भांडणे लावून आपल्या जुन्या स्टाईलने जनतेची दिशाभूल करणे चालू आहे पन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी जनतेची दिशा भूल करणाऱ्या नेतेमंडळींना धूळ चारत राजेश पवार याच्या हातात या मतदार संघाची धुरा सोपवली व कोरोना सारखी महामारी निर्माण होऊन देखील नायगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विकासाची चक्रे राजेश पवार यांनी थांबू दिली नाही
त्यांची ही विकास कामांची घोडदौड बगुन मतदार संघात विरोधकांत अशांतता पसरली व यातूनच आता जाती जातीत भांडणे लावन्याची जुनी स्टाईल या भागातील विरीधकांनी सुरु केली असली तर जनतेचे मत राजेश पवार यांच्याच बाजून असल्याचे पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत आहे रस्ते व या मतदार संघातील गाव खेड्यात त्यांनी केलेला सर्वांगीन विकास पहाता आता येथील मतदार आपली दाळ शिजू देणार नाहीत हे लक्षात आल्याने
विरोधक अनेक प्रकारचे डाव टाकत आहेत पन जनता सुज्ञ असून अशा कूट कारस्थाणास या भागातील मतदार कधीच भीक घालणार नाहीत विकास विरोधी पुढऱ्यांचा हा डाव देखील जनता नक्की हानून पाडेल असे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी दै. तरुण भारतशी बोलताना सांगितले