तळणी – मंठा तालुक्यातील तळणी येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे यांची ७६ वी जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक सलोखा, विकासाभिमुख विचार आणि लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या लोकसंग्रहातील कार्याचे स्मरण करत गावातील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुंढे साहेबांच्या कार्याचा ध्यास, सामान्यांच्या प्रश्नांवरील त्यांची लढाऊ वृत्ती आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रेरणादायी आठवण करून दिली.
या कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष नितीन राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे, सरपंच गौतम सदावर्ते,शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास सरकटे, भाजपा तालुका उपाध्यक्ष शरद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सरकटे, शिवसेना (उबाठा) गटाचे ता.संघटक ज्ञानेश्वर सरकटे,अविनाश राठोड, रामेश्वर सरकटे, केशव येऊल माधव खुळे कैलास येऊल दत्तराव लाड भागवत मुर्तडकर गोपाल सरकटे भाजपा युवा ता.उपाध्यक्ष विनायक राठोड, नवनाथ खंदारे, डॉ. किरण नागरे, डॉ. शिवशंकर कांगणे, डॉ. अमोल पाटील, सतीश सरकटे, कृष्णा आळदकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे युवा मंच,तळणी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध वक्त्यांनी ग्रामीण भागातील विकासकामे, शैक्षणिक प्रगती, जलव्यवस्थापन, युवकांच्या संधी आणि सामाजिक एकजुटीवर भर देत मुंढे साहेबांचा कार्यधर्म पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
जयंती कार्यक्रम शांत, समृद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गावात ऐक्य, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कृष्णा मुळे तर आभार वैभव कांगणे यांनी केले.
सायं ६ वाजता भव्य मिरवणूक बस स्टॅन्ड भागातून ते दक्षिण मुखी मारुती मंदिरापर्यंत निघणार आहे.


























