कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण.
नवीन नांदेड प्रतिनिधी
कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त असर्जन येथील शंकरराव चव्हाण प्राथमिक विद्यालय प्रांगणात सिडको मनपाचे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड व वृक्ष मित्र मोहनराव पाटील घोगरे यांच्या हस्ते १०० वृक्षाचे वृक्षारोपण
करण्यात आले.
कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने दिनांक १६ जुलै रोजी शंकरराव चव्हाण प्राथमिक शाळा प्रांगणात सिडको मनपाचे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड व वृक्ष मित्र मोहनराव पाटील घोगरे यांच्या हस्ते १०० वृक्षाचे वृक्षारोपण
करण्यात आले. या प्रसंग सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी वृक्षारोपण केलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याची हमी संबंधित शाळेच्या शिक्षिकांना देण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश वडजे, शिक्षक तुकाराम पातेवार, सरपंच साहेबराव पवार,तुडमे डि वाय,जि.एस.कदम, , एम. व्ही.वनंजे, विठ्ठलराव रेड्डी, एस. बी. कउटकर, जाधव के. डी. यांच्या सह विधार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.