सोलापूर शहर पोलिस मुख्यालयातील पोलिस शिपाईस निलंबित करण्यात आले आहे.कर्तव्यपालन करीत असताना कसुरी केल्याप्रकरणी पोलिस शिपाई काशिनाथ विष्णुपंत वाडेकर ऊर्फ बापु वाडेकर नेमणूक पोलिस मुख्यालय सोलापूर शहर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस शिपायचे नाव आहे. १९ फेबुवारी २०२४ रोजी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आलेली होती. मिरवणुकी पूर्वी ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लघंन होऊ नये, या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालय येथे शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, साऊंड चालक-मालक यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये मंडळाचे पदाधिकारी व साऊंड चालक-मालक यांना साऊंड सिस्टमचा आवाज मर्यादीत ठेवणे, दोन बेसपेक्षा अधिक बेस लावू नये अश्या सूचना देण्यात आले होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२४ च्या अनुषंगाने हुतात्मा चौक (चार पुतळा), सोलापूर येथे शिवप्रकाश प्रतिष्ठान या मंडळाची स्थापना झाली होती.१९ फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगता मिरवणूक निघाली होती. त्या अनुषगाने १९/०२/२०२४ रोजी सदर मंडळाने जागेवर साउंड सिस्टीम लावले होते. त्या साऊंड सिस्टम आवाज मोठ्या प्रमाणात असल्याने बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर मंडळास साउंड सिस कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावेळी मंडळाचे गणेश वानकर व इतरांना भडकावून काही होत नाही,आपण वाद्याचा आवाज ठेवलाच पाहिजे नाहीतर मिरवणूक पुढे जाऊ द्यायचे नाही, असे म्हणून सदर मंडळाचे कार्यकर्ते यांना चिथावणी देऊन मिरवणुक थांबवून रस्त्यावर बसा अशा सूचना दिल्या. त्यानुसार रवि कोटमुळे व गणेश वानकर या व्यक्तीसह तेथे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती पोलिसी शिपाई काशिनाथ विष्णुपंत वाडेकर यांनी केली होती. तसेच दिनांक ०२/०६/२०२३ रोजी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त सोलापूर शहरामध्ये पुरुषोत्तम कारकल यांनी छत्रपत्री शिवाजी महाराज चौकातून मेकॅनिक चौक-सरवस्ती चौक-रेवणी मारुती मंदीर-दत्त चौक-नामदेव चिवडा-विठ्ठल मंदरी मार्गे शिवस्मारक मैदान पर्यंत पालखी मिरवणुक काढलेली होती.
सदर मिरवणुकीस योग्य असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता, त्यावेळी पालखी बंदोबस्तास नेमण्यात आलेले नसताना विनाकारण पालखी मिरवणुकीत सामिल होवुन लेझीम खेळुन पोलीस खात्याचे शिस्तीस बाधा येईल असे कृत्य केले होते. पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे बेकायदेशीर कृत्य करुन बेशिस्तचे वर्तन केले आहे,म्हणून सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांनी पोलिस शिपाई काशिनाथ विष्णुपंत वाडेकर ऊर्फ बापु वाडेकर यास शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.