सोलापूर – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीच्या मतदानासाठी आज संग्राम नगर जिल्हा परिषद गट व यशवंत नगर पंचायत समिती गण येथे सकाळपासूनच मतदारात उत्साह निर्माण झाला होता आज सकाळी यशवंत नगर येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील व सौ वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी यशवंत नगर येथील मोहिते वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी सात तीस वाजता मतदानास सुरुवात झाली सकाळी दहा वाजेपर्यंत कमी गर्दी दिसत होती नंतर ग्रुप ने मतदार मतदानासाठी येताना दिसत होते दुपारी बारा वाजेपर्यंत तीस टक्के पर्यंत मतदान झाले होते संग्राम नगर येथे पंचायत समिती गणाचे उमेदवार व सौ राजेश्वरी कृष्णराव माने पाटील व निशा किशोर गिरमे या उमेदवारांनीयांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.
पाटील वस्ती येथील कृष्णानंद विद्यालय येथील बुधवार 91 वर्षे वयाच्या गोदाबाई विश्वंभर लोखंडे यांनी आपल्या मुलाच्या व सोन्याच्या मदतीने मतदान केंद्रावर येऊन मतदान केले
























