जगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या बोगस कामाची चौकशी करण्याबाबत दर्शनाळचे ग्रा.पं.सदस्यांनी अक्कलकोट पंचायत समिती व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देले असता त्याच्याकडून कोणतीच हालचाली न दिसुन आल्याने आकाश माने यांनी तिरडी घेऊन अक्कलकोट पंचायत समितीच्या गेटसमोर आमरण उपोषणाला बसले होते.चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे लेखी पत्र प्रभारी गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
रोजगार हमी योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात आले.मात्र त्या कामास बांधकाम विभागाचे व शासन नियमावलीचे पालन न करता कामे केले आहे.मजुरामार्फत कामे करण्याऐवजी बोगस पध्दतीने मजुरांचे ठसे घेऊन हजेरी मस्टर भरण्यात आले.ते देखील दुसऱ्या गावच्या रोजगारांकडून मस्टर भरून घेतले.अंगठे कोणी केले?बोगस बिले कोणी काढले आणि पैसे कोणी खाल्ले यांची चौकशी करण्यात यावी. दोषी?आढळणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात करावी व कनिष्ठ अभियंता गाडेकर यांनी बोगस एम बी करण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यावर करण्यात आलेल्या खोटं गुन्हा त्वरित रद्द करण्यात यावे व ग्रामसभा व मासिक सभा न घेता बोगस ठराव लिहिण्यात आले असून ठरावात खडा खोड करण्यात आले आहे व ग्रामपंचायत सदस्य ठेकेदार असेल तर त्याचे सदस्य रद्द करण्यात यावी यासह विविध कामाची चौकशी त्वरित करण्यात यावी म्हणुन ग्रा.पं सदस्य आकाश माने यांनी तिरडी घेऊन आमरण उपोषणाला बसले होते.पंधरा दिवसात चौकशी करून संबंधित रोहयो कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे.