धाराशिव – मातंग समाजासाठी ऐतिहासिक निर्णय झाला असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी शासकीय दुध डेअरी येथील एक एकर जागेचा ताबा नगरपरिषद धाराशिव कडे सोपवण्यात आला आहे..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनायक राणाजगजितसिंह पाटील साहेब, यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर.
लोकनायक आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळे मातंग समाजाची 40 वर्षापासून प्रलंबित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंबंधीची मागणी मंजूर.
शासकीय दुध डेअरीची एक एकर जमीन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, धाराशिव येथे उभारण्यासंदर्भात लोकनायक आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे महायुती सरकारने शासकीय दुग्ध डेअरीची एक एकर जागा ज्याची शासकीय किंमत 2 कोटी 08 लाख रुपये असून ही रक्कम नगरपरिषद धाराशिव यांनी महाराष्ट्र शासनाला देणे अपेक्षित होते परंतु नगरपरिषद धाराशिव यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे लोकनायक राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी ही जागा शासनाकडून मोफत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे सातत्यपूर्ण प्रयत्न करून ही जागा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी विनामूल्य स्वरूपात मिळवून घेतली आहे.
या जागेसंबंधीचा निर्णय माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांनी मागील दोन दिवसांपूर्वीच दिला असून सदर जागा नगरपरिषद धाराशिव यांच्याकडे विनामूल्य, विना मोबदला हस्तांतरित केली आहे.आज दिनांक 16 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालय धाराशिव यांच्याकडून माननीय नगराध्यक्ष व माननीय मुख्याधिकारी साहेब धाराशिव यांच्याकडे या जागेसंबंधीची ताबा पावती देण्यात आलेली आहे .ही जागा लोकनायक आमदारांनी राणादादा यांच्या प्रयत्नामुळे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी राणादादांच्या आग्रहामुळे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी करण्यासाठी विनामूल्य स्वरुपात नगरपरिषद धाराशिव यांना दिली आहे.
आज नगरपरिषद धाराशिव च्या सर्वसाधारण सभेत लोकनायक आमदार राणा पाटील साहेब यांनी मातंग समाजाच्या मागील 40 वर्षापासून च्या मागणीचा हा विषय पूर्ण केल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,महसूल मंत्री चंद्रशेखरजी साहेब,लोकनायक,आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
या जमिनीचा ताबा नगर परिषद धाराशिव यांच्याकडे मिळाल्यानंतर मातंग समाज बांधवांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती जागेच्या ठिकाणी जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी धाराशिव नगरीच्या नगराध्यक्षा माननीय सौ नेहाताई राहुल काकडे, मुख्याधिकारी सौ नीता अंधारे मॅडम,राहुल काकडे, बांधकाम सभापती अभिजित काकडे,पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे,बापू पवार, वंदना पवार, दत्ता पेठे,बापू पवार,किसन पेठे, खंडू चांदणे, सुमित क्षीरसागर,इतर सर्व सहकारी व मातंग समाज बांधव उपस्थित होते.


























