सोलापूर – सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर येथील प्रक्षेत्र हे १६ एकरामध्ये वसलेले असून सदर प्रक्षेत्रावर एकूण ४ पक्षीगृह आहेत. तसेच अंडी उबवणूक केंद्र हे देखील स्वछ ठेवले असून अवैद्य / गैरकृतीस प्रतिबंध तसेच मालमत्तेचे व वृक्ष संरक्षणासारखे काम एक महिला अधिकारी असताना डॉ. बोधनकर यांनी सक्षमपणे कर्तव्य पार पाडत असल्याचे सांगितले. तसेच डॉ. बोधनकर यांनी यापूर्वी घेतलेल्या प्रशिक्षणाच्या तुकड्यांमधून अनेक प्रशिक्षणार्थी स्वतः लघुउद्योजक यशस्वीरीत्या तयार झाल्याचे जिल्हा परीषदेचे पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. अनिल तांबे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर सोलापूर येथे कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डाॅ. अनिल तांबे
यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल तांबे बोलत होते.
सघन कुक्कुट विकास गटाचे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डाॅ. स्नेहंका बोधनकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने, यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीचर जमादार व देशमुख यांनी परिश्रम घेतले.



























